Tuesday, 7 July 2026

मसगा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत बसपास वाटप

 मसगा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत बसपास वाटप

मालेगाव प्रतिनिधी

         महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मासिक पास योजनेअंतर्गत महाविद्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना शंभर टक्के मोफत पास योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, सहाय्यक वाहतूक अधिकारी मनीषा देवरे व मयूर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने व महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. शशिकांत भदाणे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थिनींना महाविद्यालयातच मोफत पासचे वाटप करण्यात आले.    या वर्षी(2026-27) इयत्ता बारावीच्या जवळ जवळ २०० विद्यार्थींना मोफत बस वाटप करण्यात आले योजनेमुळे विद्यार्थिनींना जागेवर महाविद्यालयातच पास उपलब्ध होत असून मुलींची होणारी गैरसोय थांबवली असून या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील परिवहन समितीचे अध्यक्ष प्रा. हितेश पवार प्रा. मिलिंद पवार, प्रा. विजय पाटील, चंद्रशेखर कन्नौर यांनी विशेष मेहनत घेतली




No comments:

Post a Comment

14