M.S.G. Arts, Science & Commerce Junior College, Malegaon Camp, Nashik (2026-27)
Tuesday, 14 July 2026
Thursday, 9 July 2026
छत्रपती संभाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराज सयाजीराव गायकवाड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. एस. एल.आहिरे हे होते त्यांनी सांगितले की छत्रपती संभाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती असून छत्रपती संभाजी महाराज हे अद्वितीय शौर्य, अदम्य साहस, आणि राष्ट्रभक्ती यांचे प्रतीक होते ते एक दूरदर्शी राजकारणी, अनेक भाषांचे जाणकार, आणि कुशल प्रशासक होते, त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना सांगितले की त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही ओळखला जातो.शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. ते कोल्हापूर संस्थानाचे अत्यंत पुरोगामी राजे होते. त्यांनी समाजात जातिभेद निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार आणि आरक्षण यांसारख्या ऐतिहासिक सुधारणा घडवून आणल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा डॉ..मनीष सोनवणे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. के. बच्छाव यांनी केले तर आभार डॉ. ए.. यु. पाटील यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर डॉ. कल्याण कोकणे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.पी.ए अहिरे प्रा. डॉ यु.के टेके, आय. क्यू एसी कॉर्डिनेटर प्रा.डॉ. मिलिंद आहिरे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. शशिकांत भदाणे, वोकेशनल विभागाचे प्रा. पवार कार्यालययीन अधीक्षक जयवंत कट्यारे त्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
लोकनेते व्यंकटराव हिरे यांची ४६ वी पुण्यतिथी साजरी
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,महाराजा सयाजीराव गायकवाड कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांची ४६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अजय ठाकरे यांनी लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे कार्य विशद करताना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश झोत टाकतांनाकर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या निधनानंतर त्यांनी 'महात्मा गांधी विद्यामंदिर' आणि 'आदिवासी सेवा समिती' या संस्थांची धुरा यशस्वीपणे सांभाळली. मालेगावसह दुर्गम आदिवासी भागांत अनेक महाविद्यालये व शाळा सुरू करून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली याबाबत माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत आतून प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी लोकनेत्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.अरुण पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन व आभार प्रा.मिलिंद पवार यांनी मानले. यावेळी नोडल ऑफीसर डॉ. कल्याण कोकणे, पर्यवेक्षक प्रा.पी.ए.अहिरे,डॉ.मनीष सोनवणे डॉ.यु.के. टेके कनिष्ठ महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.शशिकांत भदाने, राजेंद्र निकम, कार्यालयीन अधीक्षक जयंत कटारे यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Tuesday, 7 July 2026
मसगा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयास भेट
मसगा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयास भेट
मालेगाव प्रतिनिधी
महाराजा सयाजीराव गायकवाड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट तथा अमृत संवाद सेतू या योजनेच्या माध्यमातून मालेगाव तहसील कार्यालयास भेट देली यावेळी कार्यालयात चालणाऱ्या कारभाराविषयी तसेच विविध योजनांविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. मा. तहसीलदार श्री. विशाल सोनवणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी माहिती दिली यावेळी बोलताना मा.सोनवणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना फौजदारी विभाग,महसूल विभाग अन्नसुरक्षा विभाग कार्यालयाकडून देण्यात येणारे विविध दाखले तसेच विविध योजना या विभागातील चालणाऱ्या कामकाजा संदर्भातील सविस्तर माहिती दिली याबरोबरच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर धडपड करणे महत्त्वाचे असते असे नमूद केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत सेतू विभागाचे संयोजक दीपकजी गुप्ता यांनी केले तर आभार प्रदर्शन अजिंक्य कन्नल यांनी केले.
माननीय प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात तहसील कार्यालयाशी येणाऱ्या अनेक गोष्टींना उपयोग होईल असे नमूद केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अजय ठाकरे, पर्यवेक्षक प्रा.शशिकांत भदाणे यांच्या मार्गदर्शनाने प्रा. मिलिंद पवार, प्रा. जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
मसगा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत बसपास वाटप
मसगा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत बसपास वाटप
मालेगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मासिक पास योजनेअंतर्गत महाविद्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींना शंभर टक्के मोफत पास योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, सहाय्यक वाहतूक अधिकारी मनीषा देवरे व मयूर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने व महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. शशिकांत भदाणे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थिनींना महाविद्यालयातच मोफत पासचे वाटप करण्यात आले. या वर्षी(2026-27) इयत्ता बारावीच्या जवळ जवळ २०० विद्यार्थींना मोफत बस वाटप करण्यात आले योजनेमुळे विद्यार्थिनींना जागेवर महाविद्यालयातच पास उपलब्ध होत असून मुलींची होणारी गैरसोय थांबवली असून या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील परिवहन समितीचे अध्यक्ष प्रा. हितेश पवार प्रा. मिलिंद पवार, प्रा. विजय पाटील, चंद्रशेखर कन्नौर यांनी विशेष मेहनत घेतली
-
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,महाराजा सयाजीराव गायकवाड कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांची ४६ वी पुण्यतिथी ...
-
मसगा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मोफत बसपास वाटप मालेगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राजमाता पु...
-
मसगा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयास भेट मालेगाव प्रतिनिधी महाराजा सयाजीराव गायकवाड कला वाणिज्य विज्ञान महाविद्य...

.jpeg)











.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

